शरद पवार यांची प्रदेश सचिव तुकाराम साळुंखे यांनी घेतली भेट
शरद पवारांना भेटल्याने ऊर्जा मिळाली – साळुंखे
घडसी समाजाचे प्रश्न शरद पवार यांच्या समोर साळुंखे यांनी केले उपस्थित
प्रतिनिधी : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच प्रदेश सचिव तुकाराम साळुंखे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून काम करत असलेल्या अठरापगड बारा बलुतेदार या समाजातील घटकाला योग्य न्याय द्यायच्या भूमिकेतून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि घडसी समाजाचे धाडसी नेतृत्व तुकाराम साळुंखे हे आवर्जून उपस्थित होते.यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व समूहाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करणे गरजेचे आहे,अशा प्रकारची भूमिका मांडली सोलापूर जिल्ह्यातून एकमेव पदाधिकारी उपस्थित राहिल्याने शरद पवार यांच्याशी त्यांना संवाद साधणे सोपे गेलं आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांना संवाद साधण्याचा योग आल्याने प्रदेश सचिव तुकाराम साळुंखे भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.शरद पवार यांना भेटल्याने मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली असल्याची भावना साळुंखे यांनी व्यक्त केली.
तसेच घडशी समाजाचे प्रलंबित समाजाचे विषय मागण्या घेऊन शासन दरबारी मांडण्याचे व समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश सचिव तुकाराम साळुंखे टील यांनी पुणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व राज्यप्रमुख जयदेव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा पगड जातीचे ५९ प्रतिनिधी यांनी प्रत्येक समाजाचे विचार मांडले व निवेदने शरद पवार व जयदेव गायकवाड यांच्याकडे देण्यात आली.बहुजन समाज शासनाच्या सुख सोयी सवलती पासून वंचित राहिला आहे,यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे यासाठी शरद पवारांनी सर्वाधिकार सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख जयदेव गायकवाड साहेब यांना सूचना दिले. प्रलंबित प्रश्न मार्गी लावूया असे मार्गदर्शन केले,घडशी समाज आणि समाजाच्या व्यथा तुकाराम साळुंखे पाटील यांनी व्यक्त केल्या.कार्याध्यक्ष गुलाब प्रीतम वाडेकर, जाधव सचिव सुनील पवार ,प्रवीण वाडेकर ,निलेश वनारे,शिवदास वाडेकर,राम कृष्ण हरी साळुंखे पाटील,संतोष पवार पुणे अध्यक्ष घडशी समाज सांगली जिल्हा अध्यक्ष सातारा जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती घडसी समाजाचे प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव तुकाराम साळुंखे यांनी दिली.
