पत्रकार सचिन रणदिवे यांची पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रार….

पत्रकार सचिन रणदिवे यांची पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रार….

सार्वजनिक ठिकाणी बोलणाऱ्या व्यक्तीचा पोलीस घेणार शोध…?

प्रतिनिधी : पत्रकार सचिन रणदिवे यांनी सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.माळशिरस तालुक्यात निघणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात पत्रकार सचिन रणदिवे यांनी त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत,त्यामुळे तालुक्यातील काही कार्यकर्ते यांच्या बद्दल मिळालेली माहिती बातमीच्या माध्यमातून सार्वजनिक केली असल्याने आणि बातमीच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली असून त्याचा राग मनामध्ये धरून पत्रकार सचिन रणदिवे यांना सार्वजनिक ठिकाणी थांबून त्यांना जीवे मारण्याची भाषा केली जात असून त्यांच्या जीविताला माळशिरस तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही बरे वाईट झाल्यास जण आक्रोश मोर्चाच्या आयोजकांना जबाबदार धरण्यात यावे असे सचिन रणदिवे यांनी तक्रारी अर्जात नमूद केले आहे.तक्रारी अर्जाची तात्काळ दखल घेवून संबंधिताचा बंदोबस्त करण्याची मागणी सचिन रणदिवे यांनी सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.हे सर्व प्रकरण मातंग संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर संघर्ष समितीने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.सचिन रणदिवे यांच्या पाठिशी असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom