मोडनिंब येथे ५३ लाख रुपये रस्त्याचे दुरुस्तीचे आदेश ….
तक्रारदार सिद्धार्थ शेंडगे यांच्या पाठपुराव्याला आले यश
प्रतिनिधी:- मौजे.मोडनिंब येथे आरोग्य केंद्राच्या समोरील रस्ता व आदर्श नगर रस्ता आठ महिन्या पुर्वी बनवण्यात आला होता रस्त्याचे काम चालु असताना तक्रार केली होती तरी सुद्धा ठेकेदाराला बिल अदा केले होते तक्रारदार यांनी चार वेळा तक्रार दोन माहिती अधिकार केल्या नंतर चार चौकशी पत्र काढले होते या नंतर चौकशी अहवाल दि.16डिसेंबर 2022 रोजी देण्यात आला यामध्ये रस्त्याचा वरचा थर खराब झाला रस्ता दुरुस्ती करणे व पुर्ण रस्त्याला ग्रुव्ह कटिंग करणे असे आदेश ठेकेदार सह्याद्री कन्टक्शन पालवन व श्रीराम कन्टक्शन वडसिंगे यांना देण्यात आला आहे
