बहुजन ब्रिगेड संघटनेचा सोलापूर जिल्ह्यात झंझावात
जिल्हाध्यक्षासह,पंढरपूर,मोहोळ तालुक्यातील निवडी जाहीर..
प्रतिनिधी : पंढरपूर : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी बहुजन ब्रिगेडच्या युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी प्रथमेश धनाजी आडगळे यांची निवड केली आहे.त्याचबरोबर मोहोळ युवक तालुका अध्यक्षपदी संग्राम हनुमंत डोंगरे,पंढरपूर तालुका युवक अध्यक्षपदी महादेव सोमनाथ मस्के,यांच्या निवडी करण्यात आल्या.तसेच पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी खंडु माने यांची निवड शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी केली.
यावेळी पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके,सुनिल जाधव, नेताजी शिंदे,रोहित साठे,रणजित पाटोळे,विरन झेंडे,वैभव गायकवाड, राज पाटोळे,केशव पाटोळे,अमोल शिंदे,करन पाटोळे,नितीन पाटोळे,निलेश चव्हाण,दत्ता शिंदे,अतुल पाटोळे,विशाल पाटोळे,प्रकाश पाटोळे,कुरमदास पाटोळे,करन साठे,महेश साठे उपस्थित होते.
बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला जात असून संघटनेचे कार्य पाहून सोलापूर जिल्ह्यात संघटनेने व्यापक स्वरूप प्राप्त करण्यासाठी सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी संघटनेचे काम जोरदार सुरु केले आहे.बहुजन ब्रिगेड संघटनेचा सोलापूर जिल्ह्यात झंझावात सुरु झाला आहे.



