खंडागळे व रणदिवे कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मातंग समाज संघर्ष समिती आक्रमक

खंडागळे व रणदिवे कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मातंग समाज संघर्ष समिती आक्रमक

तहसीलदारांचे मंडळ अधिकारी यांना सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

प्रतिनिधी : : सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार कार्यालयाकडे दिनांक २१/३/२०२२ रोजी पत्र पाठवुन जमीन उपलब्ध असलेचा अहवाल सादर करण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारावर तहसीलदार कार्यलयामार्फत तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा या मागणीसाठी मातंग समाज संघर्ष समिती व सकल मातंग समाजाच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालया समोर तीव्र स्वरूपात आंदोलन
करण्यात आले.आंदोलनाची दखल घेवून तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी येवून माळशिरस तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी यांना स्मरण पत्र देवून सात दिवसात जागेबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे लेखी पत्र दिले.

माळशिरस तालुक्यातील मातंग समाजाच्या खंडागळे व रणदिवे या दोन युवकाचा वेगवेगळ्या ठिकाणी खूण करण्यात आला होता तसेच त्याबद्दल पीडित कुटुंबाचे दोन हेक्टर जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा दक्षता नियंत्रण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सो सोलापूर यांनी निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांना दिनांक २१/३/२०२२ रोजी पत्रव्यवहार करून माळशिरस तालुक्यात जमीन उपलब्ध असल्या बाबतचा अहवाल २५/३/२०२२ रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यासाठी कळविण्यात आले होते,मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट झाले होते त्यानुसार माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांनी तात्काळ कार्यवाही करून जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर करावा या मागणीसाठी माळशिरस तालुक्यातील मातंग समाजाने आक्रमक भूमिका घेवून माळशिरस तहसील कार्यालया समोर तीव्र स्वरूपात आंदोलन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom