विभागीय आयुक्त कार्यालयाने केला मंत्रालयात पत्रव्यवहार

विभागीय आयुक्त कार्यालयाने केला मंत्रालयात पत्रव्यवहार

प्रांताधिकारी नेमणुकीच्या आंदोलनाची घेतली दखल

प्रतिनिधी : लवंग : माळशिरस तालुक्यात प्रांत अधिकारी यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी ५ डिसेंबर रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन केले होते,त्यावेळी आंदोलनकर्ते किरण साठे यांना महसूल विभागाच्या उपायुक्त सौ नयना बोंदार्डे यांनी मात्रालायत पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले होते.

महसूल विभागाच्या उपायुक्त यांनी महसूल,मुद्रांक शुल्क महसूल वन विभाग या विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्रव्यवहार करून उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापणा करण्यास शासन महसूल व वनविभाग सक्षम असल्याने पद स्थापना देणे अनियतकालीक व मुदतपूर्व बदलीबाबतचे अधिकार हे शासनास आहेत त्यानुसार किरण साठे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी सादर करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिव यांना केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले आहे.

आंदोलनाप्रसंगी दिलेले आश्वासन विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्त नयना बोंदार्डे यांनी पूर्ण केल्याने आणि आंदोलनाची दखल घेवून मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार केल्याने लवकरच माळशिरस विभाग अकलूज या कार्यालयात नवीन प्रांत अधिकारी यांची नेमणूक केली जाईल असा विश्वास व्यक्त करून महसूल विभागाच्या उपायुक्त नयना बोंदार्डे यांचे किरण साठे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom