डॉ आंबेडकर वसतिगृहाच्या जागेसाठी शिक्षण सहआयुक्तांकडे मागणी
किरण साठेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक
प्रतिनिधी : अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी खाजगी जागा विकत घेण्यासाठीसहायक आयुक्त समाजकल्याण सोलापूर यांनी पुणे येथील समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांना २३/१२/२०२२ रोजी पत्रव्यवहार करून दैनिकामध्ये जाहिरात प्रसिद्धी करण्यासाठी परवानगी मागून तरतूद करण्याची मागणी केली होती.त्यानंतर हालचाली होत नसल्याचे दिसून आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिनांक २९/१२/२०२२ ला प्रादेशिक उपायुक्त यांना निवेदन देवून ९/१/२०२३ ला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रादेशिक उपायुक्त यांच्या कार्यालयाकडून समाजकल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सह आयुक्त यांना पत्रव्यवहार करून अकलूजमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या निर्मितीसाठी खाजगी जागा विकत घेण्यासाठी परवानगी मागितली आहे.तसे लेखी पत्र किरण साठेंना कळविण्यात आले आहे.साठेंच्या पाठपुराव्यामुळे समाजकल्याण विभागात प्रचंड वेगाने हालचाली घडताना दिसत आहेत,वसतिगृहाच्या निर्मिती साठी खाजगी जागा विकत घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्याने साठेंचे कौतुक केले जात आहे.
