बहुजन ब्रिगेडचे पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन

बहुजन ब्रिगेडचे पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन

उपअभियंता यांचे किरण साठेंना लेखी आश्वासन

प्रतिनिधी : : फोंडशीरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात,संरक्षक भिंत,पेव्हिंग ब्लॉक,काँक्रीट रस्ता या चालू असलेल्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत माळशिरस पंचायत समितीच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष किरण साठे,आंबेडकरी चळवळीचे विकास धाइंजे,किसन खिलारे,बहुजन ब्रिगेड युवा आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे,बहुजन ब्रिगेडचे दहिगाव शाखा अध्यक्ष सचिन खिलारे,उपाध्यक्ष बापूराव बुधावले,जनकल्याण संघाचे संतोष,खंडागळे,बापू खरात,सूरज खरात,सचिन खिलारे,किसन लोखंडे,सचिन भोसले,साहिल अडगळे इत्यादी उपस्थित होते.

आंदोलनाची दखल घेवून बांधकाम विभागाचे उप अभियंता आर एस रणवरे आणि फोंडशीरस विभागाचे शाखा अभियंता आय बी मुलाणी यांनी आंदोलनस्थळी येवून प्राथमिक आरोग्य केंद्रात चालू असलेले काम अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार तांत्रिक बाबीस अनुसरून दक्षता घेत असून कामाची देयक राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्या तपासणी नंतर अदा करण्यात येईल असे लेखी पत्र किरण साठे यांना दिले.त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom