अकलूज ते माळशिरस रस्त्याचे १०० मीटर चे काम झाले पूर्ण

अकलूज ते माळशिरस रस्त्याचे १०० मीटर चे काम झाले पूर्ण

किरण साठे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

प्रतिनिधी : पिलीव : पुणे विभागाच्या एमएसआर डीसी च्या कार्यकारी अभियंता सौ अश्विनी घोडके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूज ते माळशिरस या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी निवेदन देऊन १५/८/२२ रोजी पुणे येथील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्याची दखल घेवून कार्यकारी अभियंता सौ अश्विनी घोडके यांनी संबंधित ठेकेदार असलेल्या मेघा कंपनीला तात्काळ शक्य असेल तेवढे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार अकलूज ते माळशिरस रस्त्यावर असलेल्या पाटील वस्तीच्या पुढील माळशिरस रस्त्याच्या बाजूला वरील चढावर १०० मीटर चे काम सुरू करण्यात आले होते,त्यानुसार ते काम पूर्ण करण्यात आले आहे.

सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला असून किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकामधून समाधान व्यक्त केले जाते आहे,जोपर्यंत हा रस्ता अकलूज ते माळशिरस पर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom