संगम ते टेंभुर्णी रस्त्यावर बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी Msrdc च्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन
अकलूज ते माळशिरस रस्त्याचे काम चालू करण्याची मागणी
प्रतिनिधी : पिलीव : संगम ते टेंभुर्णी रस्त्यावरती बेकायदेशीर ओएफसी केबल चे विना परवाना व बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.तसेच अकलूज ते माळशिरस रस्त्याचे प्रलंबित असलेले काम तात्काळ चालू करावे आणि त्या कामाला अडथळा आणणाऱ्या संबंधित व्यक्ती वरती गुन्हा दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी व एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके मॅडम यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी एम एस आर डी सी चे अधीक्षक अभियंता श्री राहुल वसईकर साहेब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपात बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,रफिक मुलाणी,विकास केसकर,अविराज पराडे,निलेश कासगवडे,सुजित साठे,उपस्थित होते.पुणे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गोपाळ परदेशी,हवालदार आर एस चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संगम ते टेंभुर्णी रस्त्यावर बेकायदेशीर व विना परवाना काम करणाऱ्या भारत गाडे पाटील यांच्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यासाठी २५/९/२२ ला पत्रव्यवहार करण्यात आला आहे,मात्र तो पत्रव्यवहार हा नावालाच केला असल्याचे दिसून आले आहे,त्याचा पाठपुरावा करून संबंधित अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी पुणे येथील एम एस आर डी सी चे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले,त्यानंतर अधीक्षक अभियंता श्री राहुल वसईकर यांनी संबंधित बेकायदेशीर व विना परवाना काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच अकलूज ते माळशिरस रस्त्याच्या प्रलंबीत असलेल्या कामासंदर्भात ही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
संगम ते टेंभुर्णी या रस्त्यावर बेकायदेशीर व विना परवाना काम करणाऱ्या भारत गाडे पाटील यांच्या एजन्सीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे तसेच अकलूज ते माळशिरस रस्त्याचे प्रलंबित असलेले काम त्वरित चालू करावे या मागणीसाठी ३०/९/२२ ला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता,त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता सौ अश्विनी घोडके मॅडम यांनी पत्र पाठवून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे सांगून ठेकेदाराने काम बंद केल्याचे लेखी पत्र दिले,मात्र स्वतः कामावर गेल्यानंतर तिथे काम चालू असल्याचे दिसले त्याचे पुरावे कार्यकारी अभियंता घोडके मॅडम यांच्याकडे दिले,संबंधित ठेकेदाराला घोडके मॅडम पाठिशी घालून गुन्हा दाखल करीत नाहीत म्हणून त्यांना निलंबित करण्याची मागणी करून ६/१०/२२ रोजी अधीक्षक अभियंता श्री राहुल वसईकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
किरण साठे
संस्थापक अध्यक्ष- बहुजन ब्रिगेड संघटना
