अकलूजमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा जोरदार इफेक्ट

अकलूजमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा जोरदार इफेक्ट

स्वतः मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केली पाहणी

तात्काळ स्वच्छतेच्या कामाला सुरुवात…

प्रतिनिधी : माळशिरस : अकलूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसंवाद यात्रा चालू असून त्या यात्रेदरम्यान व्यंकट नगर,विजयनगर कॉलनी,बागवान गल्ली,महर्षी कॉलनी,बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी येथील महिलांनी व पुरुषांनी शौचालयाच्या दुरावस्थेबद्दल तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तात्काळ दाखल घेऊन अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे यांना बरोबर घेऊन वरील ठिकाणी भेटी दिल्या आहेत.आणि शौचालयाची परिस्थिती दाखवण्यात आली त्यांनंत संबंधित शौचालयाची स्वच्छता तत्काळ करून घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांनी दिले होते. त्यानुसार महर्षी कॉलनी,आण्णाभाऊ साठे नगर व बागवान गल्ली येथील गटारी व शौचालयाचा
परिसर स्वच्छ करून घेतला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे, युवक शहराध्यक्ष जाकिर शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,सचिव जुबेर बागवान,सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाळा गायकवाड उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,त्यांनी राबविलेल्या जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमामुळे जनतेला समस्या मांडण्याचे ठिकाण उपलब्ध झाले असल्याची भावना अकलूजमधील जनतेमधून बोलून दाखवली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूजमधील जनसंवाद यात्रेचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom