बहुजन ब्रिगेड संघटना पोहचली थेट मंत्रालयात

बहुजन ब्रिगेड संघटना पोहचली थेट मंत्रालयात

परमिट रूम आणि बिअर बारचा परवाना रद्द करण्याची उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे केली तक्रार

प्रतिनिधी : मुंबई : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील जिल्हापरिषद शाळा,हायस्कूल,कॉलेज,बास्थानक,हॉस्पिटल,लगत चालू करण्यात आलेल्या देवांशी परमिट रूम आणि बिअर बारचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देवून केली आहे.यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे विधी व न्याय विभागाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अँड जालिंदर शिंदे,हायकोर्टाचे सहाय्यक सरकारी वकील अँड अशोक मेटकरी इत्यादी उपस्थित होते.

सदर बिअर बार मुळे शाळेला येणाऱ्या मुलींना,हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या पेशंटला,कॉलेज ला येणाऱ्या मुलींना तसेच बस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित अधिकारी यांनी परवानगी देताना जागेची पाहणी केली होती की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.असे निवेदनात म्हटले आहे.मद्यप्राशन करणाऱ्या लोकांमुळे अनेकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे संबंधित बिअर बार व परमिट रूम तात्काळ स्थलांतर करावे किंवा त्याचा परवाना रद्द करण्यात यावा,आणि अशा ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी यांनी अशी परिस्थिती असताना परवानगी दिलीच काशी ? असा प्रश्न उपस्थित करून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून राजेश खरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom