अकलूज शहराचा विकास करायचा असल्यास राष्ट्रवादीच्या पाठीशी रहा – किरण साठे
जनसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण
प्रतिनिधी :अकलूज : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमधील सर्व परिसरातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या संकल्पनेतून अकलूज मध्ये १६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर पर्यंत जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती.
दहाव्या दिवशी अकलूजमधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर कॉर्नर सभा घेऊन जनसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला.
जनसंवाद यात्रेच्या दहाव्या दिवशी अकलूजधील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
सलग दहा दिवस घेतलेल्या संवाद यात्रेच्या माध्यमातून २५० ते ३०० लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले,त्यामध्ये प्रामुख्याने दुबार रेशनकार्ड,माल मिळत नसलेले रेशनकार्डवर माल मिळविण्यासाठी कार्ड ऑनलाईन,संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,अपंगांचा मिळणारा निधी,गटारी,शौचालय दुरुस्ती, स्वच्छता इत्यादी प्रश्न दहा दिवसांत अकलूजमधील जनतेचे सोडवण्यात आले.जनसंवाद यात्रेला अकलूजमधील जनतेने चांगला प्रतिसाद दिला असल्याचे वरील सोडवण्यात आलेल्या प्रश्नावरून दिसून येते.
यावेळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अँड अविनाश काले,सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड,
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक चे जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जाकीर शेख,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,सचिव जुबेर बागवान,उपाध्यक्ष इरफान बागवान,उदय कांबळे,बाळू आण्णा खिलारे,सोमनाथ हुलगे,धवल कांबळे यांच्यासह अकलूजमधील जनता मोठया प्रमाणावर उपस्थित होती.
संवाद यात्रेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी माळशिरस तालुक्यातील व अकलूजमधील सत्ताधारी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून प्रलंबित असलेल्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले,शिंदे फडणवीस सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे वेदांत ग्रुपचा फॉस्कोन प्रकल्प गुजरातला गेल्याचे सांगून त्यांचा निषेध व्यक्त केला,आणि भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई वाढली असल्याचे सांगून जनतेचे लक्ष वेधून घेतले,तसेच अकलूज शहराचा व तालुक्याचा विकास करायचा असेल तर जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केले.
यावेळी अँड.अविनाश काले,सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड,अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी मनोगत व्यक्त केले.
सलग दहा दिवस कार्यक्रम पार पाडण्यासाठी शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक शहराध्यक्ष जाकीर शेख,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,उपाध्यक्ष इरफान बागवान,सचिव जुबेर बागवान,यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर शेख यांनी केले तर आभार सुरेश गंभीरे यांनी मानले.
