अकलूजमध्ये दररोज पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अकलूजमध्ये दररोज पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

नगरपरिषदेसमोर केले तीव्र आंदोलन

प्रतिनिधी : अकलूज : अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीतील राहणाऱ्या सर्व जनतेला दररोज / नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी अकलूज नगरपरिषदेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपात धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय आघाडीचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जाकीर शेख,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष बंडू कांबळे,बहुजन ब्रिगेडचे युवा शहराध्यक्ष उदय कांबळे,सोमनाथ लोखंडे, सागर खंडागळे,वैभव लोखंडे,मंगेश साठे,सागर खंडागळे,आकाश अडसूळ,नवनाथ खंडागळे इत्यादी उपस्थित होते.

अकलूज मधील जनतेला दररोज पाणी पुरवठा करण्यात यावे या मागणीसंदर्भात अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले,की एम जी पी बरोबर चर्चा करून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी आंदोलनकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांना दिले.आश्वासना नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom