श्रेय वादासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष.
बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी व्यक्त केला संताप,सत्ताधारी आणि विरोधक यांना धरले धारेवर.
माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी व विरोधक स्टंटबाजी मध्ये मशगुल
प्रतिनिधी : माळशिरस : माळशिरस तालुक्यामध्ये असलेल्या कुरबावी ते फोंडशीरास व कुरबावी ते दहिगाव या तसेच माळशिरस तालुक्यातील अनेक दुर्लक्षित गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असताना तालुक्यांमधील सत्ताधारी व विरोधक आम्ही एवढा कोटी निधी आणला तेवढा कोटी आणला अशा प्रकारच्या वल्गना करत असताना त्यांचे सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या अडचणीकडे साफ दुर्लक्ष होत असून यांनी आणलेला निधी जातो कुठे ? आणि कोणत्या कामासाठी आणला आहे ? का तो निधी बगलबच्चे ठेकेदार यांना पोसण्यासाठी वापरला जातो ज्या कामासाठी निधी आवश्यक आहे,त्या कामासाठी निधी या ठिकाणी उपलब्ध केलेला नसताना इतर गोष्टीकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी ही स्टंटबाजी तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांनी करू नये असा संतप्त प्रश्न बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना उद्देशून उपस्थित केला आहे.
तालुक्यातील नादुरुस्त रस्ते तात्काळ दुरुस्त होणे गरजेचे असून उगाच कोणत्याही विषयासाठी जुगलबंदी करून प्रसिद्धी मिळवण्याचा धंदा सत्ताधारी व विरोधकांनी बंद केला पाहिजे,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती त्यांनी काम केले पाहिजे,मात्र मी एवढा निधी आणला मी तेवढा निधी आणला याच्यामध्ये ते मशगुल आहेत असा संताप व्यक्त करीत संबंधितांना दत्ता कर्चे यांनी टोला लगावला आहे.
सर्वसामान्य,जनतेला,विद्यार्थ्यांना, रुग्णांना, वाहनधारकांना प्रवास करत असताना किती मोठ्या प्रमाणात नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं याची कल्पना असताना सुद्धा या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे,त्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही ही माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची शोकांतिका आहे,सत्ताधारी आणि विरोधक हे स्वतःच्या स्टंटबाजी मध्ये मशगूल झालेले असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला याठिकाणी न्याय मिळत नाही,अशा प्रकारची भूमिका या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे,सत्ताधारी आणि विरोधक यांनी ज्या गोष्टी सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजते तसेच कुरभावी ते फोंडशीरस कुरभावी ते दहिगाव व दुर्लक्षित ग्रामीण पट्ट्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला नाही तर निश्चितपणे आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि आपल्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपात बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून या माळशिरस तालुक्यामध्ये एक मोठा लढा,मोठे जनआंदोलन उभारले जाईल,याची नोंद या सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतली पाहिजे असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी दिला आहे.
