बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळेवाडी येथे ठिय्या आंदोलन

माळेवाडी मध्ये वॉटर सप्लायचा पाणीपुरवठा करा

बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळेवाडी येथे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी : अकलूज : अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीतील माळेवाडी येथील नागरिकांना वॉटर सप्लायच्या पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत व अकलूज शहर युवा आघाडीचे शहराध्यक्ष उदय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माळेवाडी अकलूज येथील सावता माळी मंदिरासमोर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जनकल्याण बहुजन महासंघाचे अध्यक्ष संतोष खंडागळे, मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेश शिंदे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,लहू खुडे,रोहन साठे इत्यादी उपस्थित होते.आंदोलन युवा आघाडीचे शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी आयोजित केले होते.

अकलूज नगरपरिषद स्थापन झाल्या पासुन अकलूज मधिल माळेवाडी येथील नागरिकांना पिणेचे पाणीपुरवठा वॉटर सप्लाय चे काम अजून केले गेलेले नाही.आशा तेथील नागरिकांच्या तक्रारी आहेत.सदर स्थानिक नागरिकांना तिथे पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण असून आपण त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी पुरवठा करून सदर स्थानिक नागरिकांना कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा असे निवेदनात म्हटले होते.

आंदोलनाच्या अनुषंगाने अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी लेखी पत्र देऊन अकलूज व माळेवाडी दोन्ही गावाची मिळून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची कार्यवाही चालू असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर काम चालू करण्यात येईल.असे आश्वासन दिले.आंदोलन स्थळी येऊन नगरपरिषदेचे कर्मचारी मल्हारी बाबर यांनी लेखी पत्र दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom