अकलूज नगरपरिषदेला बहुजन ब्रिगेड संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अकलूज नगरपरिषदेला बहुजन ब्रिगेड संघटनेचा आंदोलनाचा इशारा

उदय कांबळे झाले अकलूज नगरपरिषदेच्या विरोधात आक्रमक

प्रतिनिधी : अकलूज : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक
दयानंद गोरे यांना युवा आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी निवेदन देऊन अकलूज मधिल विजय चौक येथील रस्त्या वरील गटारीच्या चेंबरला झाकण बसविण्यात यावे अशी मागणी केली आहे.निवेदन कार्यालयीन अधीक्षक सुनील काशीद यांनी स्वीकारले.

अकलूज मधिल विजय चौकातील रस्त्या वरील गटारीच्या चेंबर वरील झाकण बरेच दिवस बसविलेले नसल्यामुळे. ते चेंबर उघडेच आहे.त्या रस्त्यावर चेंबरचे झाकण नसल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना ये-जा करताना त्रास होत आहे.व वाहनधारकास त्रास होत आहे.तिथे अपघात होण्याची शक्यता आहे.तरी आपण लवकरात-लवकर त्या रस्त्या वरील चेंबरचे मजबूत झाकण बसवावे अन्यथा मागणीची दखल न घेतल्यास बहुजन ब्रिगेडच्या वतीने दि.18/05/2022 या दिवशी अकलूज मधील विजय चौक येथे लोकशाहीपद्धतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे युवा आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी अकलूज नगरपरिषदेला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom