अकलूज मध्ये महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

अकलूज मध्ये महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

प्रतिनिधी : अकलूज: गॅस,पेट्रोल,डिझेल,खाद्यपदार्थ, खाद्य तेल,तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि शेतकऱ्यांना शेतात लागणाऱ्या खतांच्या वाढलेल्या किमती आणि वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अकलूजमधील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सदुभाऊ चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आलेल्या घोषणाबाजीने सदुभाऊ चौक दणाणून गेला होता,चौकाच्या चारही बाजूने जनतेची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधून घेतले असल्याचे दिसून आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक शहराध्यक्ष जाकीर शेख,राहुल ढेरे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,जुबेर बागवान,सतीश जाधव उपस्थित होते.सदर आंदोलनाला काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय आघाडीचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,जनसेवा रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,बहुजन ब्रिगेड संघटनेचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी पाठिंबा दिला.आंदोलनाचे निवेदन अकलूज गावचे मंडलाधिकारी चंद्रकांत भोसले यांनी स्वीकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom