पं. स. सदस्या सौ प्राजक्ता वाघमारे यांच्या कामाचे मेडद येथे लोकार्पण..
वार्ताहर:- माळशिरस
पंचायत समिती सदस्य सौ. प्राजक्ता स्वप्नील वाघमारे या शिवसेनेच्या एकमेव व मेडद गणाच्या सदस्य असून संपूर्ण माळशिरस तालुक्यात १५ वा वित्त आयोगाचा निधी वाटपामुळे चर्चेत आहेत. मेडद गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रेचे शुभारंभाचे औचित्य साधून त्यांच्या १५ वा वित्त पंचायत समिती स्तर २०२०-२१ फंडातून श्री काळभैरवनाथ देवस्थान साठी सार्वजनिक सुविधा पुरवणे या कामातून भव्य ५३ किलो ची घंटा व मेडद ग्रामस्थांसाठी ३ लक्ष ८० हजार रुपयांचे स्वयंचलित जलशुद्धीकरण उपकरण (एक्वा एटीएम फिल्टर युनिट) प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
या कामामुळे संपूर्ण मेडद गावासाठी व श्री काळभैरवनाथ देवस्थान साठी येणाऱ्या भक्तांना स्वच्छ व मापक पाणी उपलब्ध होणार असून मोठा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. यामुळे सदर कामाची चांगली चर्चा परिसरात व पांचकृषित झाली आहे. सदर कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता वाघमारे, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब लवटे – पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव तुपे, उपसरपंच शिवाजीभाऊ लवटे, प्रसिद्ध उद्योजक दादासाहेब जगताप, भास्कर तुपे, माजी सरपंच तुळशीराम तुपे, दत्तात्रय गोरे, सुधीर महाडिक, ॲड केशव लवटे, सचिन लवटे, ॲड विजय सोनटक्के, गीताताई सोनटक्के, ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
