माळशिरस तालुक्यात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या हायमास्टची चौकशी करा

माळशिरस तालुक्यात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या हायमास्टची चौकशी करा

२१ फेब्रुवारी रोजी जिल्हापरिषद समोर ठिय्या आंदोलन.

प्रतिनिधी : सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे क्र २ चे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना श्री अजनाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देऊन आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०-२१ ते २१-२२ या कार्यकाळात माळशिरस तालुक्यात उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.सदर निवेदन कार्यकारी अभियंता श्री अजनाळे यांनी स्वीकारले.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०२०-२०२१ ते सन २०२१-२०२२ मध्ये माळशिरस तालुक्यातील उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याच्या कामामध्ये वापरलेले मटेरियल गुणवत्तापूर्ण नसल्याची शक्यता असून अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून हायमास्ट बरोबर लावण्यात आलेल्या बल्प वारंवार जाण्याची परिस्थितीत ओढावली आहे,तसेच या कामाचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी असतानाही ही हायमास्ट दुरुस्ती केले जात नसल्याच्या तक्रारी जनतेने आमच्याकडे केल्या आहेत,त्यामुळे हायमास्ट उभारताना दर्जाहीन मटेरिअल वापरले असल्याची शक्यता असून काही ठिकाणी जागा प्रस्तावित केलेल्या असताना हायमास्ट इतर ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत तरी आपण या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या सर्व हायमास्ट दिव्याच्या मटेरियल ची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी २१ फेब्रुवारी २२ रोजी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom