माण देशी चॅम्पियन्स च्या शिरोपेचात आणखी एक तुरा

माण देशी चॅम्पियन्स च्या शिरोपेचात आणखी एक तुरा

म्हसवड दि.८(महेश कांबळे)

भारतीय महिला ज्युनिअर हॉकी संघात माणदेशी चँम्पियनच्या अश्विनी कोळेकर व काजल आटपाडकर या दोन खेळाडुंचा समावेश करण्यात आल्याने माण तालुक्यात एकच जल्लोष सुरु असुन या दोन खेळाडुंची‌ भारतीय संघात निवड झाल्याने माणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याचे बोलले जात आहे.
माण तालुका हा जसा बुध्दीवंताचा म्हणुन ओळखला जातो तसा तो क्रिडापटुंचा म्हणुनही आता नव्याने ओळखला जावु लागला असुन याच माणदेशी मातीतील अनेक खेळाडुंनी आपल्या वैयक्तिक कामगिरीवर माणचा नाव लौकिक देशपातळीवर पोहचवला आहे, नवीन युवा खेळाडुंना अशा वैयक्तिक क्रिडा स्पर्धेत अव्वल स्थान मिळवता यावे त्यांच्याकडुन नवनवीन विक्रम व्हावेत यासाठी म्हसवड येथील माणदेशी चँम्पीयन ज्याप्रमाणे कार्य करीत आहेत त्यांच्या प्रयत्नातुनच अनके ग्रामीण खेळाडुंना नवीन व्यासपिठ मिळत असुन ते खेळाडु माणदेशीच्या प्रोत्सामुळे देशपातळीवर चमकु लागले आहेत.
अश्विनी कोळेकर आणि काजल आटपाडकर यांची भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघात निवड झाल्याने संपूर्ण खेळाडू जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
भविष्यामध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि अंडर २० महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन इंडिया हॉकी निवड समितीने ३ आठवड्यापूर्वी ६६ खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर ज्युनिअर महिला ट्रेनिंग नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया बेंगलोर येथे प्रशिक्षक एरिक वॉनिक मार्गर्शनाखाली घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरासाठी संपूर्ण देशामधील ६६ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामधे महाराष्ट्र ज्युनियर महिला हॉकी संघातील चार खेळाडूंची निवड झाली होती. तीन आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर ज्युनिअर महिला हॉकी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी या ६६ खेळाडू मधून ३३ खेळाडूंची निवड येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आणि अंडर २० महिला हॉकी वर्ल्ड कप साठी केली. यामधे महाराष्ट्र संघातील काजल आटपाडकर, अश्विनी कोळेकर, ऋतुजा पिसाळ व वैष्णवी फाळके चारही खेळाडूंची निवड झाली. यामधे वैष्णवी फाळके व अश्विनी कोळेकर यांची मिड फिल्डर खेळाडू म्हणून तर काजल आटपाडकर आणि ऋतुजा पिसाळ यांची फॉरवर्ड खेळाडू म्हणून निवड झाली.
माणदेशी फौंडेशन व चॅम्पियन्सच्या आश्र्विनी कोळेकर आणि काजल आटपाडकर या दोन्ही खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.या दोन्ही खेळाडूंनीआज पर्यंत अनेक स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच या दोघी मागील १० वर्षापासून औरंगाबाद येथील क्रिडा प्रबोधनी मध्ये सराव करत होत्या व गेल्या दोन वर्षा पासून बालेवाडी पुणे येथे ज्युनिअर महिला हॉकी संघाचे कोच इम्रान शेख व अजित लाकरा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या निवड झाल्यामुळे माण देशी चॅम्पियन्सच्या शिरोपेचात आणखी एक तुरा रोवला गेला असून या निवडी बद्दल माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा व माण देशी चॅम्पियन्स अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचे म्हसवड व परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे . या दोन्ही खेळाडूंना इंडसइंड बँक स्पॉन्सर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom