कोतवाल जावेद मणेरी व अवैधरित्या काम करणाऱ्या सर्व कोतवाल यांची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करा

कोतवाल जावेद मणेरी व अवैधरित्या काम करणाऱ्या सर्व कोतवाल यांची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करा

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शेंडगे, सचिन रणदिवे, वाल्मिक रणदिवे यांची मागणी

प्रतिनिधी : अकलूज :माळशिरस तहसिल कार्यालय माळशिरस येथील सक्षम अधिकारी मा . तहसिलदार यांचे डोंगल जावेद मणेरी हा इसम हाताळत असून त्यांना त्याठिकाणचा अधिकार नसताना ही ते डोंगल हाताळत आहेत . वास्तविक पाहता जावेद मणेरी हे पुरंदावडे येळीव या ठिकाणचे कोतवाल असून त्यांना तहसिल कार्यालय माळशिरस येथील सक्षम अधिकारी मा . तहसिलदार साहेब यांचे डोंगल हाताळताना दिसून येत आहे. जरी त्यांची नियुक्ती तहसिल कार्यालय माळशिरस या ठिकाणी असेल तर गेली सात वर्षापासून जावेद मणेरी हे तहसिल कार्यालय माळशिरस याठिकाणी कोणाच्या वरदहस्ताने एकाच ठिकाणी कार्यरत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणचे कोतवाल हे तहसील कार्यालयामध्ये बेकायदेशीररित्या वर्षानुवर्षे काम करत आहेत तरी संबंधित अधिकारी हे जावेद मनेरी व अवैधरित्या बेकायदेशीर काम करणाऱ्या सर्व कोतवालांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे तहसीलदार यांच्या डिजिटल स्वाक्षरी चा गैरफायदा घेत जावेद मणेरी हे दररोज हजारो रुपये भ्रष्टाचार करत असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही?
सन 2013-14 या साली मौजे पुरंदावडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील कोतवाल भरती झालेले आहे. कोतवाल भरती झाल्यापासून ग्रामपंचायत पुरंदावडे यांनी कोतवाल नियुक्ती पासून गैरहजर असल्याबाबत ग्रामसभेचे ठराव करून देखील या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली दिसून आलेली नाही तरी या सर्व प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग यांचे 18 जानेवारी 2019 शासन पत्रकानुसार कोतवालांच्या सेवा वरिष्ठ कार्यालयात संलग्नित न करता संबंधित त्या-त्या सजा कार्यालयास त्वरित वर्ग करण्याबाबतच्या पत्रानुसार योग्य ती कारवाई करावी तसेच जावेद मणेरी यांचेकडून तहसिलदार माळशिरस यांच्या डोंगलचा अधिकार त्वरित काढून घेण्यात यावा व तहसिल कार्यालयातून बेकायदेशीर असणारा वावर बंद करण्यात यावा अशा प्रकारचे विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार यु आर देसाई मॅडम यांना देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शेंडगे, सचिन रणदिवे, वाल्मीक रणदिवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom