टाकळी गावातील प्रश्न अमोल घोडके यांच्या प्रयत्नामुळे सुटला
अमोल घोडकेच्या मागणीला मिळाले यश
प्रतिनिधी : पंढरपूर : टाकळी तालुका पंढरपूर येथील
महावितरण कंपनीला निवेदन देऊन कमी होल्टेज व विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. टाकळी गावातील ग्रामस्थ यांनी महावितरण कंपनीचे मीटर धारक असून, सदर जागेतील लाईट होल्टेज कमी असल्याने घरामधील पंखा व घरामधील पिण्याच्या पाण्याची मोटर सुद्धा चालत नसल्याचे निवेदनात म्हटले होते, सदर विषयास अनुसरून महावितरण कंपनीने गादेगाव ऑफिसकडे पत्रव्यवहार करून मागण्या पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थ यांनी
गादेगाव वितरण कंपनीचे एज्युकेटेड गवळणी साहेब व जाधव साहेब, यांचा आम्ही टाकळी भागातील ग्रामस्थ मनापासून आभार मानले आहेत, या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा बहुजन ब्रिगेड संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष तसेच चर्मकार संघाचे अध्यक्ष अमोल घोडके यांनी केला होता,त्यामुळे अमोल घोडके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे,यावेळी सर्व ग्रामस्थांनी अमोल घोडके यांचे आभार मानले.
