केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांची माफी मागावी – किरण साठे

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांची माफी मागावी – किरण साठे

प्रतिनिधी : अकलूज : उपविभागीय अधिकारी अकलूज
ता.माळशिरस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची केंद्र सरकारने अवहेलना केल्याच्या गटनेचा निषेध नोंदवला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष उमाजी मिसाळ,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,हनुमंत वायदंडे,गणेश साठे,सोमनाथ खंडागळे,आनंद मिसाळ,उदय कांबळे,रफिक मुलाणी इत्यादी उपस्थित होते.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल दुटप्पीपणा दाखविला असून त्यांनी आण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नसल्याचे कारण दाखवुन त्यांना प्रबोधन करांच्या यादीतून वगळल्याच्या जाहीर करून त्यांची अवहेलना केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देशाबाहेर अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झालेले असताना त्यांची दखल रशिया सारख्या देशाने घेतलेली असताना त्यांना प्रसिद्ध नाहीत हे कारण दाखवून त्यांना प्रबोधनकारांच्या यादीतून वगळणे हे निषेधार्य गोस्ट असून केंद्र सरकारच्या ज्या विभागाने हा अनुसूचित प्रकार केला आहे त्या विभागाने तात्काळ आण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकारांच्या यादीमध्ये समाविष्ट करावे आणि महाराष्ट्र राज्यासह आण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांची माफी मागावी अन्यथा केंद्र सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom