पंचनामा :-नातेपुते शहरासह ३२ गावातील अवैद्य धंद्याचा

पंचनामा :-नातेपुते शहरासह ३२ गावातील अवैद्य धंद्याचा

मंथली ३० हजार रुपये हप्ता घेणाऱ्याचा होणार भांडाफोड

प्रतिनिधी : नातेपुते : पश्चिम भागातील नामांकित शहर म्हणून नातेपुते शहराची ओळख आहे,नातेपुते शहरासह ३२ गावातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या गावामध्ये चालू असलेल्या झुगार, मटका,गुटखा,हातभट्टी दारू विक्री,निर्मिती,बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना आमच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केली आहे.

पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये अवैद्य रित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे,त्या बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियाकडून एका गाडीला मंथली ३० हजार रुपये हप्ता घेतला जात असल्याची माहिती सार्वजनिक झाली आहे.त्याची चर्चा नातेपुते शहरासह पश्चिम भागातील सर्वसामान्य जनतेमध्ये चालू असल्याचे पहायला मिळते आहे.पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक कुणाच्या अभयाने किंवा आशीर्वादाने चालत आहे हा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

ज्या अधिकाऱ्याला मंथली ३० हजार रुपये हप्ता दिला जातोय त्याचाच आशीर्वादाने हा बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुक चालू असून त्या हप्ताची वसुली करण्याचे काम त्यांच्याच कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी करीत असल्याचेही नातेपुते शहरासह ३२ गावातील जनतेला माहिती झाले आहेत.

बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांकडून कोणत्या वसुलदाराने किती मंथली हप्ते गोळा केले आहेत ? त्यांच्या नावासाहित त्यांचा व प्रभारी अधिकारी यांच्या नावाचा भांडाफोड लवकरच करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom