ए.पी.आय.सोनवलकर व नवनाथ माने,मसाजी थोरात यांना निलंबित करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचा २४ जानेवारीला उघडे नागडे आंदोलन करण्याचा इशारा
प्रतिनिधी : सोलापूर : नातेपुते पोलीस स्टेशनचा पदभार घेतलेले ए पी आय सोनवलकर यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणावर अवैद्य धंद्यात वाढ झाली असून त्यांचा नातेपुते पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रभाव दिसून येत नाही, त्यामुळे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या संदर्भात विविध मागण्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास ए पी आय सोनवलकर,पोलीस कर्मचारी नवनाथ बापू माने,मसाजी थोरात यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष युवराज रणदिवे आणि बहुजन ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष विकास बनसोडे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सौ तेजस्विनी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ए पी आय सोनवलकर यांनी पदभार घेतल्यापासून ते दिनांक २९ डिसेंबर २१ रोजीपर्यंत नातेपुते शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अवैद्य धंदे सुरु असल्याचे दिसून आल्यास संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी,नातेपुते शहरात व त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये हातभट्टी दारू विक्री केली जात आहे.ती त्वरित बंद करण्यात यावी.नातेपुते पोलीस स्टेशन च्या हद्दीतील गावांमध्ये झुगार,मटका,गुटखा,बेकायदेशीर वाळू वाहतूक, केली जात आहे ती त्वरित बंद करण्यात यावी. ए पी आय सोनवलकर यांनी पदभार घेतलेल्या दिनांकापासून ते २९ डिसेंबर २१ अखेर पर्यंत शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास अवैध धंदे,,बेकायदेशीर वाळू वाहतूक,दारू वाहतूक,मटका,झुगार,याबाबत फुटेज मध्ये गोष्टी सापडणार आहेत.याचीही चौकशी करण्यात यावी. ए पी आय सोनवलकर यांनी पदभार घेतल्यापासून ते २९ डिसेंबर २१ अखेर पर्यंत जप्त केलेल्या वाळूची ओव्हरलोडची कारवाई करण्यासाठी RTO अधिकारी यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहारची चौकशी करण्यात यावी.जप्त केलेल्या एकूण बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावरती किती केसेस केल्या ? केसेस न करता किती वाहने सोडून देण्यात आली तसेच महसूल च्या कर्मचारी यांनी तक्रार दाखल केलेल्या व पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्या एकूण वाहनांची सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत. नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी नवनाथ माने व मसाजी थोरात हे वसुलीचे काम करीत असल्याची चर्चा नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनतेमध्ये चर्चा असून त्याचीही आपण चौकशी करावी.नातेपुते पोलीस स्टेशन च्या हद्दीतील अनेक गावांमध्ये हातभट्टी दारूची निर्मिती केली जात आहे.ती त्वरित बंद करण्यात यावी.नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंदे करणारे व्यावसायिक उघडपणे धंदे करीत असताना आमचे हप्ते चालू असल्याने आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाहीत असे सार्वजनिक ठिकाणी बोलत असल्याने पोलीसांच्या कर्तव्याबाबत जनतेमध्ये शंका उपस्थित केली जात आहे. तरी आपण त्वरित चौकशी करून कारवाई करावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत.तसेच सदर मागण्यांची चौकशी करून ए पी आय सोनवलकर यांना तसेच वसुलीचे काम करीत असल्याची चर्चा असलेले पोलीस नवनाथ माने व मसाजी थोरात यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर २४ जानेवारी २०२२ रोजी तीव्र स्वरूपात उघडे नागडे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष युवराज रणदिवे आणि बहुजन ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष विकास बनसोडे यांनी दिला आहे.
