पोट ठेकेदार झाला नगरपरिषदेचा कामगार

पोट ठेकेदार झाला नगरपरिषदेचा कामगार

पुणे पॅटर्न प्रतिनिधी : अकलूज

दोन ग्रामपंचायतचे मिळून ….नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाले आहे.त्यापैकी एका ग्रामपंचायत चा कामगार हा पोट ठेकेदार असताना नव्याने अस्तिवात आलेल्या नगरपरिषदेमध्ये कामगार म्हणून रुजू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांना झटका बसला आहे.

…वाडी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेला ….नामक कर्मचारीच ग्रामपंचायत च्या हद्दीतील रस्त्याची,गटारीची व इतर कामे दुसऱ्या ठेकेदार यांच्या नावावर घेवून ठेकेदारी करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे,हा ….नामक कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना त्याला सर्व प्रकारची कामे करण्यासाठी कोणी अभय दिले होते,या ….नामक कर्मचाऱ्याला काम जाण्याची भीती नव्हती का ? किंवा स्वतः ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असताना अशी कामे करून संबंधित ग्रामपंचायत चे ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांना हा …नामक कर्मचारी कमिशन देत असल्याची चर्चा पूर्वी अस्तित्वात असलेल्या …..वाडी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात चालू आहे,त्यामुळे या ….नामक कर्मचारी यांनी ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच यांना हाताशी धरून हा पोट ठेकेदारीचा धंदा उभा केला होता हे स्पष्ट झाले आहे. संबंधित ….नामक कर्मचारी हा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असल्याचे ८० टक्के गावातील जनतेला माहिती नव्हते,पुणे पॅटर्नच्या माध्यमातून संबंधित कामगार यांची चौकशी केली असता हा कर्मचारी आम्हाला ग्रामपंचायत मध्ये कधीच दिसला नाही असे अनेकानी माहिती दिली,त्यामुळे काम ग्रामपंचायत मध्ये करायचे तसेच पगार ग्रामपंचायत ची घ्यायची आणि पोट ठेकेदार म्हणूनही काम करायचे हा डबल उद्योग …. नामक कर्मचाऱ्यांने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे,तसेच दोन गावाची मिळून एक नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर हा ….नामक कर्मचारी नगरपरिषदेमध्ये कर्मचारी म्हणून दिसल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यामुळे या संबंधित…. नामक कर्मचारी यांनी केलेली सर्व कामे व त्यांची सर्व कर्तृत्व पुणे पॅटर्नच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर मांडले जाणार आहे.

पुढील अंकात वाचा …. नामक कर्मचारी यांचे पूर्ण नाव व कोणत्या नगरपरिषदेमध्ये ठेकेदार झाला कामगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom