एसटी कर्मचाऱ्यांच्या विलगीकरणाच्या मागणीसाठी सकारात्मक विचार करण्यासाठी निवेदन
अकलूजमधील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बहुजन चा पाठिंबा
प्रतिनिधी: अकलूज : अकलूजमधील आगाराचे प्रमुख यांना निवेदन देवून एस टी कर्माचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चालू असलेल्या आंदोलनाला बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा अध्यक्ष व अकलूज शहराचे युवा आघाडीचे शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी पाठिंबा दिला.सदर निवेदन सहाय्यक वाहतूक नियंत्रक (टी आय) वायदंडे यांनी स्वीकारले.यावेळी अकलूज आगारचे अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले,यावेळी लोकसभा अध्यक्ष बंडू कांबळे,युवा शहराध्यक्ष उदय कांबळे,सूरज मोहिते,आदित्य काकडे इत्यादी उपस्थित होते.
राज्यात एसटी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन सुरू करण्याचा आले आहे, अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे. राज्य सरकार आणि विरोधी पक्ष हे मात्र एसटी कर्मचारी यांच्या जीवाशी खेळत असून त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेना भाजप या पक्षाने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत.आणि सत्तेत बसलेले महाविकास आघाडी सरकारकामगारांच्या प्रश्नापासून पळ काढत आहे असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे असे निवेदनात म्हटले आहे.
एसटी आगारात चालू असलेल्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याच्या तसेच नोकरीवरून निष्काशीत करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे कर्मचारी यांचे म्हणणे आहे. सदर आंदोलनाला बहुजन ब्रिगेड संघटनेचा पूर्णपणे पाठींबा देत असल्याने सांगून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना निष्काशीत करून नये आणि सरकारने संबंधित एसटी कर्मचारी यांच्या विलनीकरण करण्याच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी असे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या निवेदनात नमूद केले आहे.
