मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यासमोर लक्षवेधी सेनेचे १७ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यासमोर लक्षवेधी सेनेचे १७ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

प्रतिनिधी : अकलूज : अकलूजमधील अकलूज कोव्हीड हॉस्पिटलमध्ये झालेल्या भ्रष्टाचार व अनियमितता झालेल्या कारभाराची चौकशी करून ज्या रुग्णांचे ज्यादा पैसे घेतले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत देण्यात यावे या मागणीसाठी लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,प्रदेशाध्यक्ष अमित भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे त्यानुसार उद्या दिनांक १७/११/२१ रोजी पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय लक्षवेधी सेनेने घेतला आहे.

संबंधित हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून पैसे उकळल्याची शक्यता असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे विद्यमान आमदार रणजितसिंह पाटील यांनी लक्ष घालून संबंधित पैसे उकळलेल्या रुग्णाला न्याय मिळवून द्यावा आणि संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी न करता पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर ती कारवाई करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ती लक्ष घालून संबंधित अकलूज कोव्हीड हॉस्पिटलची संपूर्ण चौकशी करण्यात यावी तसेच अकलूज कोव्हीडचे व्यवस्थापक डॉक्टर नितीन एकतपुरे यांचे स्वतःचे असलेले श्री हॉस्पिटल त्यांच्या चौकशी दरम्यान हॉस्पिटलमध्ये अनियमितता आढळून आली असून अकलूज गावाला मेडिकल हब म्हणून ओळख निर्माण झालेली असताना शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे अनेक प्रकार अकलूज मध्ये दिसून येत आहेत तरी श्री हॉस्पिटलवरती आणि अकलूज कोव्हीड हॉस्पिटल वरती कारवाई करण्यासाठी लक्ष घालून जनतेचा ज्यादा घेतलेलापैसा कोव्हीड हॉस्पिटल ने परत द्यावा या मागणीसाठी दिनांक १७/११/२१ रोजीपासून लक्षवेधी सेनेच्या वतीने शिवरत्न बंगला येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे व प्रदेशाध्यक्ष अमित भिंगारदिवे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom