गटविकास अधिकारी स्मिता पाटील व ताकभाते यांना कारणे दाखवा नोटिसा
किरण साठे यांच्या आंदोलनाची विभागीय आयुक्त यांनी घेतली दखल
प्रतिनिधी : माळशिरस : माळशिरस तालुक्यातील अकलूज व इतर ८ ग्रामपंचायतीचे नियोजित प्रादेशिक विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या गावातील बांधकाम परवण्याची चौकशी करण्याची मागणी दिनांक ०५/१०/२०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी केली होती.सदर मागणीच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी श्री प्रकाश वायचळ यांनी यांनी दिनांक १६/१०/२०२० रोजी आदेश काढून सहाय्यक गट विकास अधिकारी श्री एम एस बेळळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.श्री बेळळे त्यांनी केलेल्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी विलंब केला जात असल्याच्या निषेधार्थ किरण साठे यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर तीन वेळा आंदोलन केले होते.सदर आंदोलनादरम्यान दोषी असलेल्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
साठे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे आस्थापना विभागाने सोलापूर जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दोनवेळा पत्रव्यवहार करून कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता मात्र,त्यांनी त्या आदेशानुसार कार्यवाही केली नाही आणि नंतर स्वतः पुणे विभागाचे आयुक्त डॉ सौरभ राव यांनी सोलापूर जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांना सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी आढणाऱ्या अधिकारी यांच्यावर पंधरा दिवसाच्या आत कार्यवाही करून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयास पूर्तता अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अधिकारी श्री बेळळे यांनी दिलेल्या अहवालानुसार अकलूज व इतर आठ ग्रामपंचायतीचे नियोजित प्रादेशिक विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या गावातील बांधकाम परवाना विकास शुल्काची रक्कम चलनाने भरणा नियमानुसार भरावयाच्या रकमेपेक्षा कमी/जास्त भरणा झालेले आहेत, नियमापेक्षा कमी शुल्काची रक्कम भरणा केलेल्या एकूण ३६ परवानाधारकाकडून वसूल करून दिनांक २८/१२/२०२० रोजी पर्यंत चलनाने भरणा करून घेतलेल्या आहेत,शासन नियमानुसार बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार प्रति चौ. फुटला देय विकास शुल्काची रक्कम भरणा करून घेतलेले नाहीत.यास संबंधित अधिकारी कर्मचारी व अधिकारी जबाबदार आहेत.अकलूज व इतर ८ ग्रामपंचायतीसाठी च्या प्रादेशिक प्राधिकरनांतर्गत बांधकाम परवाना देण्यासाठी विकास शुल्काबाबत किंवा सहायक संचालक,नगर रचना,सोलापूर यांच्याकडील कोणतेही परिपत्रक पाहण्यास मिळाले नाही. तरी संदर्भ क्रमांक पाच अन्वये वरील दोन्ही मुद्दे यांच्या चौकशी अहवालात नमूद केल्याप्रमाणे दिनांक १ जानेवारी २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२० कालावधीतील एकूण ३६ प्रस्ताव हे श्री ए.बी.ताकभाते तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या कार्यकाळातील असून उर्वरित ७ प्रस्ताव श्रीमती स्मिता पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या कार्यकाळातील असून याबाबत या कार्यालयाकडून संबंधित दोन्ही गट विकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले आहे,वरील दोन्ही मुद्याच्या अनुषंगाने लेखी खुलासा मागविण्यात आलेला असून खुलासा प्राप्त होताच तदनंतर पुढील योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल तसेच दिनांक 1 जानेवारी 2019 ते 31 ऑक्टोबर 2020 कालावधीतील पंचायत समिती माळशिरस कार्यालयाकडील संबंधित कार्यासन लिपिक व सदरील प्रस्ताव मंजुरी करता गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करताना नस्ती वर सह्या करणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नावे व कालावधी बाबतची गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांचेकडून मागविण्यात आले असून माहिती प्राप्त होताच प्रस्तुत प्रकरणी दोषी असणारे अधिकारी कर्मचारी यांचेवर नियमानुसार पुढील योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.आशा आशयाचे पत्र सोलापूर जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे.त्यामुळे माळशिरस पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे,त्यामुळे मी केलेल्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून माळशिरस तालुक्याच्या तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्यावर दोष सिद्ध झाला असल्याने व त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने माझ्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.
