भाजपाच्या पाठपुराव्याला यश फुरसुंगी उरळी पाणी पुरवठा योजना होणार चालू
प्रतिनिधी : फुरसुंगी: फुरसुंगी उरुळी देवाची एमजीपी( MGP) पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने निधी बंद केला होता त्यामुळे काम बंद होते ते अर्धवट राहिलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे महानगरपालिका , महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ , स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने ,सभागृह नेते गणेशजी बिडकर ,फुरसुंगी प्रभारी नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्याकडे पाणी योजना निधीसाठी सतत पाठपुरावा करून तीन कोटी निधी मंजूर करण्यात आला याबद्दल फुरसुंगी-भेकराईनगर-उरुळी देवाची तमाम नागरिकांच्या व ग्रामस्थांच्यावतीने हार्दिक आभार. या पाणीप्रश्नासाठी श्री धनंजय आप्पा कामठे अध्यक्ष भाजपा मध्य हवेली तालुका व श्री संतोष भाऊ हरपळे उपाध्यक्ष भाजपा मध्य हवेली तालुका व भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला .


