बहुजन ब्रिगेडचा अकलूज नगरपरिषदेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा
दूषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी
प्रतिनिधी : अकलूज : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीतील जनतेला दूषित पाण्याचा करण्यात येणारा पाणी पुरवठा त्वरित थांबवून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी अकलूज नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्याकडे बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी केली आहे,सदर निवेदन कार्यालयीन अधीक्षक बाळू वाईकर यांनी स्वीकारले.
अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून अकलुज मधील जनतेला दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईन मधून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येत असून अकलूज मधील जनता मोठ्या प्रमाणावर आजारी पडण्यास सुरुवात झाली असून येणाऱ्या पाण्यामध्ये मातीमिश्रित असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ दूषित पाणीपुरवठा करण्याचा बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा आणि अकलुज नगर परिषद हद्दीमध्ये असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न बंद करावा त्याच पद्धतीने या दूषित पाण्यामुळे धोक्यात आल्यास त्यास सर्वस्वी अकलूज नगरपरिषद जबाबदार राहील याची नोंद घ्यावी तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा न केल्यास आपल्या कार्यालयाच्या विरोधामध्ये दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी अकलूज येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा उदय कांबळे यांनी दिला आहे.
