अकलुज नगरपरिषदेच्या विरोधात लक्षवेधी सेनेचा आंदोलनाचा इशारा

अकलुज नगरपरिषदच्या विरोधात लक्षवेधी सेनेचा आंदोलनाचा इशारा

सर्व कामगारांना कायम करण्याची मागणी

प्रतिनिधी : अकलूज : पूर्वीची अकलूज ग्रामपंचायत असलेल्या कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कर्मचारी अधिकारी यांना नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगरपरिषद मध्ये कायम करण्याची मागणी लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी निशांत प्रचंड राव यांना निवेदन देऊन केली आहे.यावेळी लक्षवेधी सेने चे प्रदेशाध्यक्ष अमित भिंगारदिवे बहुजन ब्रिगेड युवा संघटनेचे अकलुज शहराध्यक्ष उदय कांबळे उपस्थित होते.

गेली कित्येक वर्ष अकलुज ग्रामपंचायत अस्तित्वात असताना अकलुज मधील जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वच्छता विभाग आरोग्य विभाग पाणीपुरवठा, तसेच सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले असून त्यांच्या योगदानाची फळे त्यांना मिळावी त्यांनी केलेल्या सेवेची पोचपावती मिळावी आणि त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामपंचायत असताना काम केले त्याच पद्धतीने काम करण्यासाठी आहे त्या ठिकाणी कायम करून त्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा अकलूज नगरपरिषदेच्या विरोधात अकलूज येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक १७/८/२०२१ रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी दिला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom