राष्ट्रवादीचे उमाजी मिसाळ यांच्या आंदोलनामुळे माळशिरस पंचायत समिती बांधकाम विभाग खडबडून जागा.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष उमाजीअण्णा मिसाळ कण्हेर पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार.
माळशिरस
राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाजी अण्णा मिसाळ यांनी माळशिरस पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आला आठ नंबर चौकी ते सदाशिवनगर या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे डांबरीकरण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिलेला होता निवेदनाची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता कुपल यांनी दखल घेऊन सदरच्या रस्त्याला 18 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदरच्या रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल अशा आशयाचे पत्र दिलेले आहे.
सदरच्या निवेदनामध्ये चाहुर वस्ती ते इस्लामपूर चौक याही रस्त्याचे निवेदन दिले होते सदरचा रस्ता कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सोलापूर यांच्याकडे येत असल्याने सदर कार्यालयाच्या ठिकाणी पाठपुरावा करण्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे डून कळविण्यात आलेले आहे सदर दोन्ही रस्त्याचे काम कण्हेर पंचायत समिती गणा मध्ये येत आहे सध्या पंचायत समिती गणाचे प्रतिनिधीत्व ज्येष्ठ सदस्य गौतमआबा माने करीत आहेत सदर चा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होणार आहे त्यामुळे सदर पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार म्हणूनउमाजी अण्णा मिसाळ यांच्याकडे पाहिले जात आहे उमाजी अण्णा यांनी समाजासाठी आणि त्या परिसरामध्ये सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे उमाजी अण्णा मातंग समाजातील आदर्श व ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते भविष्यामध्ये गौतम आबा यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पंचायत समिती गणाची जबाबदारी येऊ शकते उमाजी आण्णा यांनीसुद्धा भविष्यातील जबाबदारी ओळखून माळशिरस तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे पहिल्यापासून उमाजी अण्णांचा सामाजिक व राजकीय ार्यक्रमांमध्ये सहभाग असतो त्यांचा स्वभाव वर्तणूक यामुळे त्यांना निश्चितपणे त्या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष उमाजी अण्णा मिसाळ यांनी निवेदन दिले होते त्यावेळी सोलापूर जिल्हा चिटणीस विश्वास वाघमारे माळशिरस तालुका अध्यक्ष रजनीश बनसोडे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष आकाश भैय्या लोखंडे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सोमनाथ तोरणे तालुका सरचिटणीस अभिजीत केंगार चिटणीस जिल्हा चिटणीस विशाल मोहिते अशोक वायदंडे दत्ता जगताप व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
