अकलूजमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची सांगता
नगरविकास मंत्री यांना निवेदन,
उपविभागीय अधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठविला अहवाल
प्रतिनिधी-लवंग-यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायतचा समावेश करूनच अकलूज,माळेवाडी(अ)ग्रामपंचायतचे नगरपरिषद मध्ये रुपांतर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटण्यासाठी वेळ देवून २२/६/२०२१ रोजी साठे याना मंत्रालयात बोलविण्यात आले होते,सदर निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या,त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदन सादर केल्याने अकलूजमध्ये चालू असलेल्या आंदोलनाची दखल महाविकास आघाडी सरकारने घेतली असल्याची माहिती किरण साठे यांनी दिली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्याकडून लेखी पत्र देवून सहाय्यक आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आल्याचे कळविले असल्याने अकलूजमध्ये चालू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची सांगता दिनांक २३/६/२०२१ रोजी करण्यात आल्याची माहिती साठे यांनी दिली आहे.
यावेळी बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,अॅड सोमनाथ वाघमोडे, प.स.सदस्य अजय सकट,राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश पाटील,भानुदास सालगुडे-पाटील,सोमनाथ पिसे,लक्षवेधी सेनेचे उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे,समित्र संघाचे सुरेश गंभीरे,बहुजन ब्रिगेडचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सकट,अभय भोसले,साजिद सय्यद,जनसेवा संघटना मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,मैत्री प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, मनसे अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष आकाश लोखंडे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे अकलूज शहर अध्यक्ष आनंद मिसाळ, जनहित शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण भांगे,युवासेनेचे जिल्हा सरचटणीस दत्तात्रय गोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक चे अध्यक्ष जाकीर शेख,सोमनाथ शेळके,सैलानी सय्यद,सागर खंडागळे,लखन आरडे,आदित्य काकडे,धवल कांबळे,उदय कांबळे अभिषेक साठे, ऋषी साठे, सुजित शिंदे,व असंख्य अकलूज,माळेवाडी (अ),यशवंतनगर,संग्रामनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार अकलूज,माळेवाडी (अ)ग्रामपंचायत नगरपरिषद मध्ये रुपांतर करीत नसल्याने मोहिते पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगरपरिषद होऊ देत नसल्याचा भाजपच्या मोहिते पाटील यांनी आरोप केला आहे.
मला दिनांक २२/६/२०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठीची वेळ देण्यात आली होती,त्यांना भेटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित नगरविकास विकास विभागाला निवेदन देण्यासाठी सांगितल्याने अजित पवार यांचा अकलूज नगरपरिषद होण्यासाठी विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही,त्यामुळे मोहिते पाटील यांनी केलेले आरोप हे निष्फळ व जनतेची दिशाभूल करणारे आहेत.
किरण साठे
सरचिटणीस-सोलापूर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
