माळशिरस पाटबंधारे कार्यालयासमोर जनहित शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस ..!
माळशिरस/प्रतिनिधी:-मौजे लवंग-महाळुंग(ता.माळशिरस) येथील शेतकरी संतोष शिंदे,रा.महाळुंग यांचे निरा उजवा कालवा फलटण विभागचे माळशिरस उपविभाग अंतर्गत पाटबंधारे शाखा महाळुंग कार्यक्षेत्रातील फाटा क्र.34,दारे क्र.२ वरील पारंपारिक ब्रिटिशकालीन पोटपाट पूर्ववत करून मिळावा,या मागणीसाठी दि 21 मे शुक्रवारपासून जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन सुरू आहे.
शिंदे यांच्या शेतामध्ये पारंपारिक ब्रिटिशकालीन पोटपाट आहे.जगदंबा पाणी वापर संस्था महाळूंग या नोंदणीकृत संस्थेचे शिंदे हे सभासद आहेत.परंतु येथील काही शेतकऱ्यांनी सूडबुद्धीने शिंदे यांच्या शेतात जाणारा पोटपाट आडवला आहे आहे.याबाबत 2016-17 सालापासून अर्ज देऊनही याबाबत पाटबंधारे विभागाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही.’हेड टू टेल’ नियम धाब्यावर बसवून पाटबंधारे अधिकारी-कर्मचारी गप्प आहेत. ब्रिटिशकालीन पारंपारिक पोटपाट पूर्ववत करून मिळावा आणि सदर पाट मोडून पाणी आडविणाऱ्यावरती शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भादंवि.353 नुसार गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरु आहे. महाळुंग शाखाधिकारी सकट यांनी भगत यांचेवरती अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.परंतु पारंपरिक पाट नकाशाप्रमाणे पुर्ववत केल्याशिवाय अंदोलन स्थगित करण्यात येणार नाही,अशी भूमिका अंदोलनकत्यांनी घेतली आहे.अंदोलनामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे किरण भांगे,युवा सेना जिल्हा सरचिटणीस दत्ता गोरे, आकाश पराडे-पाटील,अनिल भोसले,संतोष शिंदे सरकार,स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड ई.उपस्थित होते. याबाबत माळशिरस पाटबंधारे विभागाचे उप अभियंता मस्कर, शाखा अभियंता सकट, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
