जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद
हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरातील ७ गुन्ह्यांची उकल
पुणे – जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरणाºया सराईत आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. सदर कारवाई हडपसर पोलिसांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे हडपसर, वानवाडी, कोंढवा परिसरातील ७ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, दिवसाढवळया कोयत्याचा धाक दाखवून हडपसर , वानवडी , कोंढवा परिसरात जबरी चोरी , ( चैनस्नॅचिंग ) जबरी चोरीचा प्रयत्न , घरफोडी , मोटारसायकल चोरी करणा झ्र या रेकॉर्डवरिल गुन्हेगारांकडुन ४ लाख ६८ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने, महागड्या किंमतीचे मोबाईल फोन, मोटरसायकल, एल.सी.डी.टी.व्ही इत्यादी हस्तगत करुन हडपसर पोलीसांनी आवळल्या रेकॉर्डवरिल गुन्हेगारांचे मुसक्या ङ्घ हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत १५/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.०० च्या सुमारास मगरपट्टा सिटीमध्ये एका जेष्ठ नागरीकांची वाँकिग करतेवेळी दोन तोळयाची चैन खेचून घेवून गेल्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
सदरचा दाखल गुन्हा हा मगरपट्टा सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना घडला होता. दोन्ही आरोपी हे अज्ञात होते त्यांनी लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकल चा वापर केला असल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजवरून निष्पन्न झालेले होते. सदर गुन्हयाचा तपास हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथके करीत होती. त्यानंतर दिनांक १८/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.१५ च्या सुमारास पुन्हा भोसले गार्डन येथे अज्ञात तीन इसमांनी मॉर्नीग वॉक करणा झ्र या एका महिलेला कोयता दाखवून तिच्या गळ्यातील चैन ओढून नेण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या सतकर्तेमुळे त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही . त्याच दिवशी सकाळी पहाटे वानवडी पोलीस ठाणेच्या हद्दीत बी.टी.कवडे रोडवर टेम्पो चालकाला कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोची काच फोडून, ड्रायव्हरवर कोयत्याने वार करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेलेली होती. घटनास्थळाचे फुटेज पाहिले असता त्यामध्ये तीन इसम हे लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकलवरून येऊन त्यांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालेले होते. या तिन्ही गंभीर गुन्ह्यांचे उकल करण्याचे मोठे आवाहन हडपसर पोलिसांना होते. तसेच दोन दिवसांमध्ये झालेल्या लागोपाठ घटनांमुळे जनमानसात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठांनी तात्काळ गुन्ह्यांची उकल करून आरोपींना तुरुंगात धाडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांची ३ पथके तपासाठी नेमण्यात आले. या पथकांनी घटनास्थळावरील प्राप्त फुटेजनुसार अज्ञात आरोपींचा व लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटार सायकलचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोशि शाहिद शेख, पोशि शशिकांत नाळे यांना मिळालेल्या बातमीवरून वरील गुन्ह्यातील संशयित वर्णनाचे जबरी चोरीचे गुन्हे करणारे तीन इसम व परलेली लाल रंगाचे पॅशन प्रो मोटारसायकलवरून हडपसर परिसरातील नवीन म्हाडा येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर परिसरात तिन्ही पथके एकत्रित करून सापळा लावला असता, मिळालेल्या बातमीतील तिन्ही संशयित इसम हे नवीन म्हाडाकडे जाणाºया रोडने येताना दिसले. त्यांना पोलीस तपास पथकातील अंमलदारांनी ओळखलेनंतर त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न थांबता मोटारसायकलवरून भरधाव वेगाने जात असता पथकातील अंमलदारांने त्यांचा पाठलाग करून त्यांना न्यू इंग्लिश स्कूलजवळ पकडले असता त्यांचेकडे विचारपूस करून त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची स्वत:ची अभिजीत ऊर्फ दाद्या अशोक रणदिवे (२१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे), सतीश आण्णाजी केदळे (३२, रा. म्हाडा कॉलनी हडपसर, पुणे) असे सांगून त्यांच्यासोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक देखील मिळून आला. त्यानंतर वरील तिन्ही संशयितांना हडपसर पोलीस ठाणे येथे घेऊन जावून त्यांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचा साथीदार नोएल ऐलेन शबान (२०, रा. कोरेगाव पार्क, सर्कीट हाऊस जवळील ब्रिजखाली बंडगार्डन, पुणे) यांच्यासह हडपसर, वानवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क, पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळेस रस्त्याने जाणारे टेम्पो, ट्रक चालक , मॉर्निंग वॉककरीता जाणारे इसम यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करत. प्रसंगी काहींना जखमी करून त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम असे जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना म्हाडा येथे दोन ठिकाणी घरफोड्या केल्यााची देखील कबुली दिलेली आहे. तसेच वरील तिन्ही आरोपींकडून महागड्या किमतीचे एकूण २४ चोरीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून, त्याबाबत अधिक तपास चालू आहे.
आरोपींच्या अटकेमुळे ७ गुन्ह्यांची उकल
चारही संशयितांकडून तपासादरम्यान खालील गुन्हे उघड झाले आहेत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३६५/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ २,३४, हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७३/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ ३.३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५, हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३६८/२०२१ भा.दं.वि.क ४५४,४५७,३८०, हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७७/२०२१ भा.दं.वि.क ४५४,४५७.३८०, वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं १६६/२०२१ भा.दं.वि.कलम ३ ९ ४,३४१,४२७,५०४,५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५, कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं ३७५/२०२१ भा.दं.वि.कलम ३९ २, ३४१, ३४, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन १०२/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९ नमुद आरोपींकडून वरील गुन्ह्यातील ४ लाख ६८ हजार ४०० रुपयांची सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल फोन, मोटारसायकल, एलसीडीटीव्ही आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहेत.
तपासी पोलीस पथक
सदर कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ चे उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे आदी पोलीस पथकाने केली.
सराईत गुन्हेगारांवर दाखल आहेत अनेक गुन्हे
आरोपी अभिजीत ऊर्फ दादा अशोक रणदीवे याचे विरूध्द दाखल असलेले गुन्हे १. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १०० / २०१९ भादंवि कलम ३७ ९ २. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ११६ / २०१ ९ भादंवि कलम ४५४,४५७,३८० ३. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ६८ ९ / २०१९ भादंवि कलम ३७ ९ ४. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ९ ६० / २०२० भादंवि कलम ३७ ९ ५. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १२० ९ / २०२० भादंवि कलम ३७ ९ ६. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १३० ९ / २०२० भादंवि कलम ३ ९ २ ७. हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १३११/२०२० भादंवि कलम ४५४,४५७,३८०,५११ आरोपी नोएल ऐलेन शबान याचे विरूध्द दाखल असलेले गुन्हे १. बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १२६ / २०१ ९ भादंवि कलम ३७९ २. पुणे रेल्वे स्टेशन , गु.र नं २ ९ १ / २०१ ९ भादंवि कलम ३०२,२०१ ३. बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं १२७ / २०१ ९ भादंवि कलम ३७ ९ ४. जीआरपी पुणे गु.र.नं १४७७ / २०१ ९ भा.दं.वि. कलम ३७ ९ ५. जीआरपी पुणे गु.र.नं १०१७/२०१८ भा.दं.वि कलम ३७ ९ , ५०६,४११ ६. येरवडा पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ६२ / २०१ ९ भा.दं.वि कलम ३७ ९ ७. खडकी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ६२ / २०१ ९ भा.दं.वि. कलम ३७९ नुसार गुन्हे दाखल आहेत.
