हवेलीत आता ‘झिरो पेंन्डसी’ : पहिल्या महिला तहसिलदार कोलतेंचा निर्धार

हवेलीत आता ‘झिरो पेंन्डसी’ : पहिल्या महिला तहसिलदार कोलतेंचा निर्धार

पुणे : हवेली तालुका हा जिल्ह्यातला एका महत्वाचा तालुका आहे. पुणे शहराचा काही भाग व लगतच्या बऱ्याचशा गावांचा समावेश या तालुक्यात होत असल्याचे कामाचा ताणदेखील अधिक आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची कामे तातडीने व्हावीत कामासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, ही माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी संपूर्ण कार्यालयाच्या स्तरावर ‘झिरो पेंडन्सी’ लागू करण्यात आली असून त्याचे चांगले परिणाम महिनाभरातच दिसतील, असा विश्‍वास हवेलीच्या पहिल्या महिला तहसिलदार तृप्ती पाटील कोलते यांनी ‘पुणे पॅटर्न’ सी बोलताना व्यक्त केला.

 हवेलीच्या तहसिलदार म्हणून तृप्ती पाटील कोलते यांनी काही दिवसांपूर्वी कामाला सुरवात केली. हवेलीच्या तहसिलदार म्हणून नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला आधिकारी आहेत. वास्तविक हवेलीत आपली नेमणूक व्हावी असे तहसिलदार व प्रांत असलेल्या प्रत्येक आधिकाऱ्याला वाटत असते. मात्र, हवेली म्हटले की नागरीकांच्या काही नकारात्मक भावना आहेत. कामाच्या माध्यमातून या दृषटीकोनात बदल करण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असे कोलते यांनी सांगितले.

कोलते म्हणाल्या, ‘‘ नेमणूक झाल्यानंतर मी लगेचच कामाला सुरवात केली असून पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच गेल्या वर्षभरातील ५० लाख रूपयांच मदतनिधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. जून २०२० ते ऑक्टोबर २०२० या काळशतील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ही भरपाई होती. कार्यालयाविषयीची सामान्य माणसाची प्रतिमा बदलणे त्यासाठी कामकाजात अमूलाग्र बदल करण्यास प्राधान्य देणार आहे.त्यासाठी झिरो पेंडन्सी योजना राबविण्यात येणार आहे. या कामाला सुरवातदेखील करण्यात आली आहे. जुन्या कागदपत्रांचे जतन करण्याबरोबरच अनावश्‍यक कागदपत्रांची विल्हेवाट लावून कार्यालयीन स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. झिरो पेंन्डसी अंतर्गत गेल्या सहा महिन्यातील पत्र व्यवहार व त्याची पूर्तता करण्याचे काम हाती घेतले आहे. कार्यालयाकडे आलेल्या कोणत्याही पत्राला विशिष्ट मुदतीत उत्तर देऊन काम मार्गी लावण्यास प्राधान्य देणार आहे.’’
हवेलीच्या पहिल्या महिला तहसिलदार म्हणून नेमणूक झालेल्या कोलते यांनी यापूर्वी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात नायब तहसिलदार म्हणून पहिली नेमणूक झालेल्या कोलते यांनी वाई, सोलापूर या ठिकाणी काम केले आहे. यापूर्वी त्या पुणे शहराच्या तहसिलदार म्हणून काम पाहात होत्या.कोरोनाचा आव्हानात्मक काळ असताना त्यांची पुण्यात काम केले आहे. नव्या नेमणुकीतही पुणे परिसरतील कोरोनाची गंभीर स्थिती हाताळण्याची जबाबादारी त्यांच्यावर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom