किरण साठे यांच्या झटक्याने अकलूज ग्रामपंचायत झाली चार्ज

किरण साठे यांच्या झटक्याने अकलूज ग्रामपंचायत झाली चार्ज

अधिकारी व कर्मचारी यांच्या केल्या पगारी

प्रतिनिधी : अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहूजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूज ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवकयांना
निवेदन देऊन ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचाऱ्याचे पगार त्वरित करणेत यावेत अशी मागणी केली होती,यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे उपस्थित होते.

आशिया खंडातील नंबर एक असलेल्या माळशिरस तालुक्यातील अकलूज ग्रामपंचायत मध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कामगारांच्या पगारी गेल्या चार ते पाच महिने व आठवडा पगारी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारी ह्या गेल्या सतरा ते आठरा आठवडे करण्यात आल्या नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेस ने निवेदनात म्हटले होते.

सद्या महाराष्ट्र राज्यात लॉक डाउन जाहीर करण्यात आले आहे,त्यामुळे ह्या कर्मचारी यांची पगार करणे फार गरजेचे झाले आहे, तसेच अकलूज ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांच्या पगारी तात्काळ करता येत नसतील तर उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी या संबंधित कर्मचारी यांना आपल्या स्वतःच्या शिवशंकर बझार मधून दोन ते तीन महिन्यांच्या पगाराच्या रकमेचा माल भरून देऊन त्यांची होणारे हाल थांबवावे आणि नंतर त्यांच्या पगारातून या मालाची रक्कम वसूल करून घ्यावी अन्यथा ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला होता,किरण साठे यांच्या मागणीची अकलूज ग्रामपंचायतच्या प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मागणी केल्याच्या दिवसापासून एकूण आठवडा कर्मचारी यांच्या आठ आठवड्याच्या व महिन्याच्या कर्मचारी यांच्या दोन महिन्यांच्या पगारी केल्या आहेत,त्याबद्दल अकलूज ग्रामपंचायतच्या प्रशासनाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण साठे यांनी आभार व्यक्त केले आहे.अकलूज ग्रामपंचायतने कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारी केल्याने अकलूज सह माळशिरस तालुक्यात किरण साठे यांच्या झटक्याने अकलूज ग्रामपंचायत चार्ज झाली असल्याची चर्चा पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom