बहुजन ब्रिगेड संघटनेची रुग्ण मदत कार्य समिती स्थापन

बहुजन ब्रिगेड संघटनेची रुग्ण मदत कार्य समिती स्थापन

रुग्ण मदत कार्य समितीच्या प्रमुख पदी राजेश खरे यांची तर सचिवपदी नानासाहेब खंडाळे यांची नियुक्ती

प्रतिनिधी सोलापूर- संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या आजाराने हैदोस घातलेला असून कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईक व स्वतः रुग्णाला उपचारासाठी सैरभैर फिरावे लागत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेड संघटनेची रुग्ण मदत कार्य समिती स्थापन करण्यात आली रुग्ण मदत कार्य समितीच्या प्रमुख पदी बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे याची व सचिव नानासाहेब खंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांनी सांगितले.

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या रुग्ण मदत कार्य समितीच्या माध्यमातून रूग्णांना ऑक्सिजन बेड,विलगीकरण कक्ष,व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती कार्यरत असणार आहे,त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नातेवाईक व कोरोनाबाधित रूग्णांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार नाही,त्याना सर्वस्वी मदत ही बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून केली जाणार असून संबंधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांनी संघटनेच्या रुग्ण मदत कार्य समितीचे प्रमुख राजेश खरे यांच्याशी 9112174516,7219659208 व सचिव नानासाहेब खंडाळे 8459738143, 8698555400 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom