सनराईज् क्रिकेट अकॅडमीची स्थापना

सनराईज् क्रिकेट अकॅडमीची स्थापना

टेंभूर्णी प्रतिनिधी- सोलापूर जिल्ह्यातील
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा.श्री योगेश बोबडे व संस्थेच्या सचिवा मा. सौ सुरजाताई बोबडे यांच्या प्रेरणेतून टेंभुर्णी परिसरातील खेळाडूंसाठी एक परिपूर्ण सनराईज् क्रिकेट अकॅडमी ची स्थापना करण्यात आली.

मुंबई -पुणे -नाशिक- सोलापूर अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये क्रिकेट ॲकॅडमी उपलब्ध आहेत त्याच सवलती या टेंभुर्णी शहरा मध्ये कशा उपलब्ध करून देता येईल आज शहरी भागांमध्ये ज्या दर्जाचे प्रशिक्षण मिळते त्याच दर्जाचे प्रशिक्षण आमच्या टेंभुर्णी मध्ये पण मिळावे या दृष्टिकोनातून टाकलेले एक पाऊल आहे़. इथल्या मुलांनी आणि मुलींनी त्यांच्या मध्ये असलेले क्रिकेटचे टॅलेंट असेल, त्यांच्या मध्ये असलेली कला असेल, त्यासाठी त्यांना एक चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण या अकॅडमीच्या माध्यमातून मिळालं तर भविष्यामध्ये याच खेळाडूंपैकी कोणी भारत संघांमध्ये असेल, कोणी आयपीएल मध्ये असेल, कोणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये चमकतील

मा. श्री मंजित नवले मुख्य प्रशिक्षक
सनराईज् क्रिकेट अकॅडमी
राष्ट्रीय खेळाडू

चौकट

टेंभुर्णी चे तरुण-तरुणी त्याच ताकतीने उतरतील अशा अपेक्षेने आणि इच्छेने आम्ही टेंभुर्णी मध्ये सनराईज क्रिकेट अकॅडमी सुरू केली आहे आणि अकॅडमी तून जे खेळाडू तयार होतील ते भविष्यामध्ये टेंभुर्णी चे नाव नक्कीच मोठे करतील एवढीच अपेक्षा
मा.श्री योगेश बोबडे
अध्यक्ष, श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ टेंभुर्णी

चौकट

या अकॅडमीत क्रिकेट सोबत मुलांच्या शारीरिक मानसिक कौशल्य, मुलांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येक मुलाकडे बारकाईने लक्ष दिले जाते उत्तम सरावाचे आयोजन केले जाते ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूंना वाटते की आपणही लेदर बॉल ने क्रिकेट खेळावे त्यांना तो इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही अकॅडमी चा नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना भविष्यात फायदा होणार आहे आणि हीच सनराईज क्रिकेट अकॅडमी बाकीच्या ग्रामीण भागातही एक प्रोत्साहन देऊ शकते.

मा. सौ सुरजाताई बोबडे
सचिवा.श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ टेंभुर्णी

ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी
श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ या संस्थेने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom