मांडवे गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी !
मांडवे प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात आणि शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात आली.परंतु कुठेतरी जयंती वर कोरोनाचे सावट जाणवत होते.
यावेळी या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे ही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १०७ लोकांनी रक्तदान केले. तर गावात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना त्यावर आळा घालण्यासाठी गावामधील २७३ लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.तर४५लोकांना लशीकरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रथमतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर साहेब सरपंच हनुमंत टेळे उपसरपंच पंचशीला गायकवाड व तात्याबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी व फुले शाहू आंबेडकर जयंती समीतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
