फुरसुंगी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी

फुरसुंगी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी

फुरसुंगी प्रतिनिधी – फुरसुंगी येथे भारतीय जनता पार्टी व स्वयंभू फाउंडेशन यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा यावेळी संतोष भाऊ हरपळे यांनी मांडला.


या वेळी भाजपा उपाध्यक्ष स्वयंभू फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष रमेश हरपळे, महेंद्र हरपळे,आकाश हरपळे, कैलास भिसे ,संतोष चाकूरे,निलेश शिंदे , ऋषिकेश सांगळे विलास पेटकर, अनिकेत काटकर इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom