नवीन बाजार तळावरील मूलभूत प्रश्न न सोडवल्यामुळे 15 एप्रिल रोजी जनसेवा संघटना तर्फे छेडणार प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. महेश शिंदे

नवीन बाजार तळावरील मूलभूत प्रश्न न सोडवल्यामुळे 15 एप्रिल रोजी जनसेवा संघटना तर्फे छेडणार प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. महेश शिंदे

अकलूज:प्रतिनिधी:उविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना जनसेवा संघटनेचे कार्यकारी सदस्य महेश शिंदे यांनी अकलूज ग्रामपंचायत च्या हद्दीतील
नवीन बाजार तळावरील दुसऱ्या टप्प्यातला डांबरी रोड झाला पाहिजे,लाईन नंबर 1 व 2 गटार दुरुस्ती झाली पाहिजे,जी एस प्रणाली प्रमाणे पिण्याच्या लोखंडी पाईप लाईन झाली पाहिजे या मागणीसाठी निवेदन दिले आहे, सादर निवेदन अव्वल कारकून कारंडे यांनी स्वीकारले,यावेळी अविनाश सोनवणे उपस्थित होते.

नवीन बाजारतळ अकलुज या ठीकानी बऱ्याच दिवसांपासून मूलभूत गरजा पुरवण्यात अकलूज ग्रामपंचायत कमी पडत आहे.वारंवार या संदर्भात निवेदना व्दारे मागण्या करून ही कार्यवाही केली जात नाही.तसेच नवीन बाजारतळ सोडला तर बाकीच्या सर्व भागांमध्ये काम चालू आहे.मग या गोष्टी जाणीवपूर्वक होतात का याचीही चौकशी झाली पाहिजे व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.व आमच्या मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार केला जात नसेल तर आम्ही आता शांत बसणार नाही जनतेच्या सामान्य प्रश्नांना वाचा फोडणार.तसेचअशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या परंतु ग्रामसेवक यांना विचारता उडवाउडवीची उत्तरे घेण्यात आली यामुळे पंधरा तारखेला प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जनसेवा संघटनेचे महेश शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom