माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी बेफिकीर
प्रतिनिधी:माळशिरस:माळशिरस तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांनी स्वतःच्या ऑफिसबाहेर एक फलक लावलेला असून त्या फलकावर ती सकाळी 9:45 ते दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज असल्याने अभ्यागंत्यांनी कृपया दुपारी दोन वाजल्यानंतर भेटावे असा फलक लावलेला असताना आज दिनांक 30 3 2021 रोजी याठिकाणी गटविकास अधिकारी स्मिता महादेव पाटील माळशिरस यांच्या केबिन बाहेर अनेक अभ्यागतानी त्यांनी रांग लावलेली असताना दुपारच्या तीन वाजून गेल्यानंतर सुद्धा गटविकास अधिकारी यांनी ऑफिसमध्ये आलेले दिसून येत नाहीत त्यामुळे हा बोर्ड कशासाठी लावला आहे अशी चर्चा माळशिरस पंचायत समितीच्या आवारामध्ये होताना दिसत आहे आपण स्वतः दिलेली वेळ पाळू शकत नसेल तर तो त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लावलेला जॉबोर्ड आहे तो काढून टाकण्यात यावा आणि सर्वसामान्य जनतेचे चालविले हाल याठिकाणी थांबावेत अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे माळशिरस गटविकास अधिकारी ह्या बेफेकीर असल्याचे दिसून येत आहे.
