आ.प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांचा राजकीय गेम केल्याची चर्चा
पंढरपूर:प्रतिनिधी:पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपा कडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपचे विधानपरिषद चे आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रयत्न केले आहेत,आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे,समाधान आवताडे हे नेहमीच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभा राहत असतात आणि समाधान आवताडे उभा राहिल्याने गेल्या निवडणुकीत सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव झाला होता,त्याची सल प्रशांत परिचारक यांच्या मनामध्ये होती,आणि याचाच बदला घेण्यासाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी आ.परिचारक यांनी प्रयत्न केले असल्याचे बोलले जावू लागले आहे,
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांना संधी देऊन २०२४ च्या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी प्रशांत परिचारक यांचे काम करण्याचा शब्द मिळविला असल्याचीही चर्चा पहावयास मिळत आहे,चुलत्याच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी व पुढील धोरण ठरविण्यासाठी आ.प्रशांत परिचारक यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना भावनिक वातावरण तयार झाले असून ही निवडणूक भाजपला अडचणी निर्माण करणारी आहे,याची कल्पना आ.प्रशांत परिचारक यांना मिळाली असल्यानेच आणि सुधाकरपंत परिचारक यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आ.प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून आवताडेंचा राजकीय गेम केल्याची जोरदार चर्चा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात रंगली आहे.
