मुख्य अभियंता यांचे चौकशी चे आदेश जांबुड ते बोरगाव रस्ता व अधिकारी यांच्यावर कारवाईचे प्रकरण

मुख्य अभियंता यांचे चौकशी चे आदेश
जांबुड ते बोरगाव रस्ता व अधिकारी यांच्यावर कारवाईचे प्रकरण

प्रतिनिधी–पिलीव —
माळशिरस तालुक्यातील जांबुड-बोरगाव-खंडाळी-निमगाव-मळोली रस्ता प्रजिमा क्रमांक १७९ कि.मी ०/०० ते६/०० या कामाची चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कन्स्ट्रक्शनवर कारवाई करण्यात यावी आणि या निकृष्ट दर्जाचे व गुणवत्तापूर्ण,प्रमाणकानुसार काम होत नसताना त्यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी ठिय्या आंदोलन केले होते.

तसेच संबंधित अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारीअभियंता,उपअभियंता,व ज्यांच्या देखरेखीखाली हे काम होत आहे ते शाखा अभियंता हे सर्वस्वी ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने कृती करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याचीही मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली होती.

आमच्या आंदोलनाची गंभीर दखल प्रादेशिक पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी घेतली असून त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांना आदेश देऊन कारवाई करण्याची सूचना केली आहे,मुख्य अभियंता यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात चे अधीक्षक अभियंता यांनी अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता यांना आदेश देऊन चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom