सर्वसामान्य जनतेचे व शेतकरी बांधवांची वीज कनेक्शन कट करू नका नाही तर आंदोलन करू — सागर बडवे
प्रतिनिधी पंढरपूर
आज लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले,महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण देशामध्ये गेल्या वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते.त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार ने ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली कि वाढीव वीज बिला मध्ये जनतेला सवलत देण्यात येईल त्यामुळे अनेक नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी लाईट विल भरले नाही व लाॅकडाऊन मुळे आर्थिक चलन बंद पडले गेले त्यामूळे पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे वर्षातून जे चार वारी भरतात कोरोना काळामुळे ते रद्द झाल्या त्यामुळे पंढरपूर शहर व तालुका आर्थिक गणित कोलमडले आहे.तर सध्या मार्च महिना चालू असल्यामुळे लाईट बिल भरा नाहीतर तुमचे विज कनेक्शन कट करण्यात येतील अशी मोहीम महावितरणाकडून सुरू आहे व तुम्हाला सवलत हवी असेल तर तुम्ही शंभर रुपयांच्या स्षाॅप पेपर वर लेखी स्वरुपात किती महिन्यात पैसे भरणार आहात अशी महावितरण कडून सूचना देत आहेत तरी आपणास एक विनंती करतो कि हे स्षाॅप पेपर रद्द करण्यात यावे व जनतेला व शेतकरी बांधवांना थोडासा अजून अवधी देण्यात यावे अन्यथा लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आपल्या कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घेण्यात यावी असं सागर बडवे यांनी सांगितले यावेळी लोक कल्याण संस्थेचे राज्य उपाध्यक्ष आकाश माने पंढरपूर संपर्क अध्यक्ष अवधूत गडकरी व कार्यकर्ते उपस्थित होते
