अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, वंचीत,एम आय एम,लक्षवेधी सेना,मनसे एकत्रित लढणार

अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, वंचीत,एम आय एम,,लक्षवेधी सेना,मनसे एकत्रित लढणार

शहरात तिसऱ्या पर्यायमुळे दिग्गजांची गोची होण्याची शक्यता !

प्रतिनिधी–अकलूज—आशिया खंडातील नंबर एकची असलेल्या अकलूज ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली असून दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी पासून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची सुरुवात झाली आहे.

ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून यामध्ये गेल्या पंच वर्षीत स्वतंत्र पॅनेल उभा करून निवडणूक लढविणारे डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचा एक पॅनेल असणार असून त्यामध्ये कोण कोण सामील होणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याच निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस,वंचीत बहुजन आघाडी,एम आय एम,, बहुजन ब्रिगेड,लक्षवेधी सेना,या पक्ष व संघटनेच्या माध्यमातून एक नवीन म्हणजे तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढविणार का ? आगामी अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार का ? यांवर अकलूजमधील मतदारांची करडी नजर असणार आहे.

सदर ग्रामपंचायतच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण साठे,वंचित बहुजन आघाडीचे अभिजित गायकवाड,एम आय एम चे मोहसीन शेख,लक्षवेधी सेनेचे अनिल साठे,अमित भिंगारदिवे,युवा सेनेचे उदय कांबळे,मनसेचे सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे बंडू कांबळे यांनी बैठक आयोजित केली होती,सदरील बैठकीत अकलूजमध्ये सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom