ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावकऱ्यांना एका महाराष्ट्र पोलिसांची सार्थ हाक
राहुल वाघमोडे सर फोंडशिरस ग्रामपंचायतला देणार एक लाख रुपये बक्षीस
प्रतिनिधी–सचिन रणदिवे
महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक गावातून इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी,युत्या आणि आघाड्या करण्यासाठी धावपळ-धडपड सुरू आहे तसेच फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावची ही ग्रामपंचायत निवडणूक ची रणधुमाळी चालू आहे परंतु गावातीलच एक युवक परंतु महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई येथे कार्यरत असणारा महाराष्ट्राचा एक युवा व्याख्याता,पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक,संचालक संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस जिल्हा सोलापूर राहुल वाघमोडे सर हा युवक मात्र फोंडशिरस ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे राहुल वाघमोडे हा युवक मौजे फोंडशिरस या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी “फोंडशिरस ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास तब्बल एक लाख रुपये रोख” गावाच्या विकासासाठी वैयक्तिकरीत्या बक्षीस स्वरूपात देणार आहेत असे आव्हान त्यांनी गावकऱ्यांना केले आहे राहुल वाघमोडे हे 2009 सालापासून महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई येथे कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्रातील युवा व्याख्याते म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस आले आहे.तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब तरुणांना साठी त्यांनी माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे स्वतःची संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस जिल्हा सोलापूर ही स्पर्धा परीक्षा संस्था उभी केली असून या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो तरुण घडविण्याचे काम ते अविरत करत आहेत.तसेच संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर,स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियान, महाराष्ट्र शासनाच्या एक कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड यासारखे उपक्रम ते दरवर्षी राबवत असतात. शिवाय महाराष्ट्रभर फिरून ते तरुणांना जागृत करण्याचे काम आपल्या वाणीतुन करत असतात राहुल वाघमोडे हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असतात.या वर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावांमध्ये होणारे वादविवाद, वेळेची बचत,पैशाचा अपवेय या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी “फोंडशिरस ग्रामपंचायत बिनविरोध” व्हावी यासाठी त्यांनी फोंडशिरस गावासाठी तब्बल “एक लाख” रुपयाचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.आता त्यांच्या आव्हानाला गावकरी व गावगाडा चालवणारे पुढारी किती प्रतिसाद देतील हे त्या गावकऱ्यांवर आणि पुढार्यांवर अवलंबून आहे.परंतु त्यांनी केलेल्या आव्हानामुळे,शिवाय गावाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या रोख बक्षीस मुळे महाराष्ट्रातून राहुल वाघमोडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
